ज्येष्ठा गौरी आवाहन कधी ? मुहूर्त आणि पूजा पद्दत जाणून घ्या Jyeshth Gauri Avahan 2024
Jyeshtha Gauri Importance 2024: हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती बाप्पाचे होईल. सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. बाप्पाच्या आगमनासाठी अनेक जण आतुर झाले आहेत. बाप्पाच्या आगमनासह महिलांमध्ये गौराईच्या आगमनाचाही उत्साह महिलांमध्ये पाहायला मिळत आहे. १० सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन होईल.
यंदा मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल; तर बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल. तसेच गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल.
Jyeshtha Gauri 2024 महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते. 2024 मध्ये 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन तर 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी गौरी विसर्जन आहे.
देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे. देवी गौरीचे घरांमध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुख-समृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते. आपआपल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते.
गणेश चतुर्थी दरम्यान गौरी गणपतीची पूजा
तीन दिवसांचा गौरी गणपती उत्सव
भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केलं जातं. पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोकं यादिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केलं जातं.
ज्येष्ठा गौरी पूजा शुभ मुहूर्त 2024
10 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी आवाहन रात्री 08.04 पर्यंत कधीही करता येईल.
11 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी पूजन
12 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी विसर्जन रात्री 09.51 पर्यंत
काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते. या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते. महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनके पदार्थांचा नैवेद्य केला जातो. सवाष्णींना हळदी कुमकुम समारंभासांठी बोलावलं जातं. भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती 5000 वर्षे जुन्या आहेत.
हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.
महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
तिसर्या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.
ज्येष्ठा गौरी आवाहनाचे महत्त्व
या दिवशी गौरी म्हणजे देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी देवी पार्वतीचे आवाहन केले जाते. गणरायाप्रमाणेच गौरींचेदेखील उत्साहत स्वागत होते. यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते. बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात. त्यामध्ये शाडू, पितळे, कापडी, फायबरचे असे काही प्रकार पाहायला मिळतात. काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात; तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात.
राज्यभरात गौराईच्या आगमनाची आणि पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते. तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रीतही असते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते. प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात. मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन, असेही म्हटले जाते. या दिवशी गौराईचा श्रृंगार केला जातो. तिला विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जाईल. अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन, तसेच माहेरवाशीणदेखील म्हटले जाते.
Join Our Instagram Page: Click Here
Join our WhatsApp Channel: Click Here
ज्येष्ठा गौरी आवाहन कधी ? मुहूर्त आणि पूजा पद्दत जाणून घ्या Jyeshth Gauri Avahan 2024