Best Hartalika Puja List 2024 : हरितालिकेचे व्रत कसे करावे? पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते?, या पद्धतीने करा पूजेची मांडणी

Hartalika Puja List 2024 : हरितालिकेचे व्रत कसे करावे? पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते?, या पद्धतीने करा पूजेची मांडणी
Hartalika Puja List 2024 : हरितालिकेचे व्रत कसे करावे? पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते?, या पद्धतीने करा पूजेची मांडणी

Hartalika Puja List 2024 : हरितालिकेचे व्रत कसे करावे? पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते?, या पद्धतीने करा पूजेची मांडणी

Hartalika Puja Samagri: हिंदु धर्मात हरितालिका हे व्रत महिला आर्वजून करतात.भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केले जाते. शास्त्रानुसार हरितालिकेचे व्रत करताना खास सामग्री किंवा साहित्याची गरज असते. हरितालिक पुजनात पत्री महत्त्वाच्या असतात. या सगळ्यांची माहिती देणारा हा लेख हरितालिका पुजा साहित्य आणि पुजेची मांडणी.

81t16txJIkL. AC UL320 hartalika
hartalika ASSA Hartalika Teej Vrat Samagri with Book | Teej Vrat Kit
₹399

Hartalika Puja Sahitya And Puja Mandani:

भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती, गणरायाच्या आगमनामुळे आपण सुखावलेले असतो आणि या महिन्यात अनेक व्रतवैकल्य केली जातात. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरितालिका व्रत केले जाते. या व्रतासाठी पुजेचे साहित्य आणि पत्री यांचे फार महत्त्व आहे. या व्रतामध्ये पुजेची खास मांडणी असते त्याबदद्ल अधिक जाणून घेऊया.

हरितालिका पूजा साहित्य

हरितालिकेच्या मूर्ती (दोन) व शिवलिंग
अत्तरफाया , हळदकुंकू , चंदनगंध , अष्टगंध , गुलाल , बुक्का , अक्षता , रांगोळी , उदबत्ती , कापूर , आगपेटी , सुटीनाणी ६ , तुपाच्या व तेलाच्या वाती , कापसाची वस्त्रे – १६ मण्यांचे १ व ५ मण्यांचे १ , तांदूळ ( वाटीभर ) पंचामृत ( दूध , दही , तूप , मध , साखर ) गूळखोबरे , नैवेद्य , सुंठवडा ( डिंकवडा ), चौरंग / पाट , आसन, पाण्याचा कलश , शंख , घंटा , समई , निरांजन, कापूरारती , पळीपंचपात्र , ताम्हण, देव पुसण्याचे वस्त्र , हातपुसणे, तसराळे, काडवाती

साहित्य

फुले , दूर्वा, तुळस, विड्याची पाने १२ , सुपाऱ्या ६ , बदाम ५ , खारका ५ , नारळ २ , शहाळे, फळे ५ / केळी ५ , पेढे ५ / खडीसाखर, कापसाची वस्त्रे, जानवे, कापूर, उदबत्ती

पत्री

बेल,आघाडा,मधुमालती,दूर्वा,चाफा,कण्हेर,बोर,रुई,तुळस,आंबा,डाळिंब,धोतरा, जाई, मरवा,बकुळ,अशोक.( उपलब्ध होतील त्याप्रमाणे )

सौभाग्यवाण

पत्रावळीवर किंवा ताटात – हळदकुंकू , तांदूळ , वस्त्र , पानसुपारी , नाणे , नारळ , गजरा / वेणी , शिधा तसेच ; फणी , काजळ , गळेसरी , कांकण , आरसा इत्यादी

हरितालिका पूजेची मांडणी कशी करावी?

  • चौरंगा किंवा पाट घ्या आणि त्याच्यावर तांदळाच्या सपाट ढिग करा.
  • त्यावर गौरी व हरिताली यांच्या मूर्ती ठेवून त्यासमोर वाळूचे लिंग तयार करावे किंवा आपापल्या प्रथेप्रमाणे पूजेची मांडणी करावी.
  • उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा.
  • समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.
  • चौरंगाजवळ तेलवात करून समई ठेवावी.
  • प्रथम सुवासिनीकडून/कुमारिकेकडून किंवा स्वत: हळदकुंकू लावून घ्यावे. त्यानंतर घरातील देवांसमोर विडा ठेवून, अक्षता व हळदकुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा.

हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा अगदी स्वच्छ असावी. चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभीत कराव्यात. सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करावी.

धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुले वाहून पूजा करावी. धूप-दीप, निरांजन दाखवावे. पुजा करत असताना उमामहेश्वराचे ध्यान करावे पुजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना तीनवेळा नमस्कार करावा. पुजा सांगण्यासाठी आलेल्या गुरुजींचा मानसन्मा करावा.

हरतालिका पुजा करताना “सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती करावी असे सांगितले जाते.
या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात

हरितालिका उत्तर पूजा

हरितालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी उत्तरपुजेची सुरुवात करावी. आचमन करून पंचोपचाराने पुजा करावी. दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता कराव्यात. यानंतर देवतांचे विसर्जन करावे. हरितालिकेचे पारणे उत्तरपुजेच्या दिवशी करतात.

हरतालिका कहाणी

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसले होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं, तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.” तेव्हा शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक. हे व्रत भाद्रप्रद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी ‘मी तुला प्राप्त व्हावे’ म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तूझ्या वडलांना फार दुःख आणि ‘अशी कन्या कोणास द्यावी?’ अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे.”हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडलांनी ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, ‘महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही’ असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडलांनी मला विष्णूला देण्याचं कबुल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, “तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही,” नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो.दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला ‘हरितालिका व्रत’ असं म्हणतात. याचा विधी असा आहे.“ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साती जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं, तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.”ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी, देवाब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.

Join Our Instagram Page: Click Here
Join our WhatsApp Channel: Click Here

Hartalika Puja List 2024 : हरितालिकेचे व्रत कसे करावे? पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते?, या पद्धतीने करा पूजेची मांडणी

Leave a Comment