Ganesh Chaturthi 2024: गणेश पूजनापासून ते विसर्जनापर्यंत या साहित्याची लागेल गरज, आजच घरी आणून ठेवा
Ganesh Chaturthi 2024 Puja Samagri List : गणेश चतुर्थी तीन दिवसावर आली आहे आणि आता सगळ्यांचीच धावपळ चालू झाली आहे. बाजारातून पूजेचं साहित्य आणायचं, घरातली आवराआवर करायची, नैवेद्याची तयारी करायची, सगळीच गडबड चालू आहे. तुमचा गोंधळ होणार नाही आणि सर्व साहित्य घरी आणले जाईल त्यासाठी संपूर्ण साहित्याची यादी दिली आहे, तपासून घ्या काहि राहीलं तर नाही.
ए आई बाप्पा आले गं, असं वाक्य आता प्रत्येका घरी बोललं जाईल. मूर्तीची नोंदणी, गणपतीसाठी मंडप, वर्गणी, देखावा अशा साऱ्या बाबींची तयारी कितीतरी दिवस आधीच सुरू होऊन काही मंडळाच्या गणेश मुर्तींचे आगमनही झाले आहे. आता घरोघरी होणाऱ्या बाप्पांचेही आगमन जवळ आले आहे. गणेश चतुर्थी पाच दिवसावर आली आहे आणि आता सगळ्यांचीच धावपळ चालू झाली आहे. बाजारातून पूजेचं साहित्य आणायचं, घरातली आवराआवर करायची, नैवेद्याची तयारी करायची, सगळीच गडबड चालू आहे. त्यामुळे आपण पूजा साहित्याची यादी केली तर एखादे साहित्य सुटणार नाही आणि संपूर्ण पूजा विधी पार पडेल. खाली तुमचा गोंधळ होणार नाही आणि सर्व साहित्य घरी आणले जाईल त्यासाठी साहित्याची यादी दिली आहे.
गणेश पूजनाचे संपूर्ण साहित्य
वाती (समईसाठी आणि तुपात भिजवलेल्या), फुलवाती तुपात भिजवलेल्या, कापसाची वस्त्रमाळ आणि वस्त्र, जानवं, गणपतीसाठी सजावटीचे सामान, फुले, फुलांचे हार, दूर्वा, विड्याची पाने, पत्री, पेढे किंवा मिठाई, फळे, नारळ, पंचामृताचे साहित्य दही आणि दुध,
मूर्ती आणतांना लागणारे साहित्य
हळद, कुंकू,अक्षता,तबक किंवा ताट, तबकात ठेवण्यासाठी आसन, नविन रुमाल मोठ्या आकाराचा
मुर्ती घरी आणल्यावर लागणारे साहित्य
पाय धुण्यासाठी भांडभर पाणी,दूध, पोळीचा तुकडा, औक्षणाचे ताट (दोन तेलाचे दिवे, कुंकू,अक्षता, सोन्याची अंगठी, सुपारी)
संपूर्ण पूजा मांडण्यासाठी लागणारे साहित्य
पाट किंवा चौरंग, आसन चौरंगावर ठेवण्यासाठी, रांगोळी, रांगोळीचे रंग, समई, समईसाठी वाती, निरांजन (२), निरांजनासाठी तुपात भिजवलेल्या फुलवाती, आरती करण्यासाठी पंचारती, आरतीसाठी तुपात भिजवलेल्या वाती, तांदूळ, घंटा, शंख, उदबत्तीचे घर/ स्टॅंन्ड, धूप लावण्यासाठी स्टॅंन्ड, विड्याची पाने – २५ नग, सुट्टे पैसे (नाणी १०), सुपारी – १० नग, खारीक, बदाम, हळकुंड,फळे, खोबऱ्याचे तुकडे (प्रत्येकी ५ नग), नारळ, नैवेद्य दाखवण्यासाठी छोट्या वाट्या
गणेश पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य
हळद, कुंकू, अक्षता, अष्टगंध, गुलाल, अत्तर, अत्तर वाहण्यासाठी थोडासा कापूस, उदबत्ती, धूप, कापूर, काडेपेटी, फुले, फुलांचा हार, दूर्वा, विड्याची पाने, पत्री (शमीचे पान, रुईचे पान, आघाडा, केवड्याचे पान इत्यादी), जानवे, पाण्याने भरलेला तांब्या, पळी आणि भांडे, ताम्हण, पंचामृत, तुपाची छोटी वाटी (निरांजनात तूप घालण्यासाठी), तेलाची छोटी बरणी किंवा वाटी (समईत तेल घालण्यासाठी), उपवस्त्र – २ मणी, वस्त्रमाळ – २१ मणी, गणपतीला घालायचे दागिने, बाजूला ठेवायच्या इतर वस्तू, चांदीच्या वस्तू इ.
यजमानाची तयारी
पितांबर किंवा सोवळं, उपरणे बसण्यासाठी आसन, पंचांग, हातरूमाल (पूजा करताना हात पुसायला), मुखवस्त्र (देव पुसण्यासाठी), पूजेचे पुस्तक, आरतीचे पुस्तक.
Ganpati Aarti गणेश चतुर्थी : पूजनानंतर म्हणा गणपतीच्या ‘या’ विविध आरत्या
घरच्या घरी थोडक्यात पूजा करण्यासाठी
पूजेची पूर्वतयारी : –
गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.
गणेश चतुर्थी दिनी प्रात:स्नान-संध्या पूजादी नित्यविधी करावेत. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं. यानंतर गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करतात व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणतात.
गणेश विसर्जन अनंत चतुर्दशी शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी आहे. काही जण एक, काही दोन, काही तीन काही पाच तर काही संपूर्ण १० दिवसानंतर गणेशाचे विसर्जन करतात. विसर्जनावेळीही बाप्पांना निरोप देतांना यातल्याच साहित्याची गरज भासेल आणि गणपती मूर्तीचं विसर्जन करण्यापूर्वी एक वस्त्र घ्या. त्यात मोदक, पैसा, दूर्वा आणि सुपारी बांधून घ्या. ते गणपती मूर्तीसोबत ठेवा. गणपतीची आरती करावी. या १० दिवसांत गणपतीची पूजा करताना आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी. त्यानंतर सम्मानपूर्वक गणपतीचं पाण्यात विसर्जन करावे.
Join Our Instagram Page: Click Here
Join our WhatsApp Channel: Click Here
Ganesh Chaturthi 2024: गणेश पूजनापासून ते विसर्जनापर्यंत या साहित्याची लागेल गरज, आजच घरी आणून ठेवा