रक्षाबंधन.. हा भारतीय संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवणारा एक सण आहे. रक्षाबंधन माहिती, इतिहास सर्वज्ञात आहे. भारतात बहिणीला आईप्रमाणे मानले जाते. भावा बहिणीचे नाते हे जगातील एक अनोखे नाते आहे. प्रत्येक भावाला त्याला सदैव पाठीशी घालणारी एक प्रेमळ बहीण हवी असते. तर प्रत्येक बहिणीला तिची सदैव पाठराखण करणारा आणि सतत तिच्या खोड्या काढणारा भाऊ हवा असतो. त्यामुळे भावा बहिणीच्या अनोख्या नात्याला हे रक्षाबंधनामुळे विशेष महत्त्व प्राप्त होते.या दिवशी बहीण भावाला राखीच्या पवित्र बंधनामध्ये बांधून ठेवते. फक्त रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन या दिवशी चालत नाही.
Happy Raksha Bandhan Wishes in Marathi- रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्यातील प्रेमाचा,हक्काचा,विश्वासाचा सण आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीनचे रक्षण करणे होय. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे जबाबदारी. रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ हा आपल्याला बहिणीला वचन देत असतो की, आयुष्यभर तुझे रक्षण करण्याची जबाबदारी ही माझी असेल
रक्षाबंधनला बहीणिला द्या ‘या’ भेटवस्तू (Raksha Bandhan Gift Ideas In Marathi)
रक्षाबंधनला बहीणिला द्या ‘या’ भेटवस्तू (Raksha Bandhan Gift Idea)
Join Our Instagram Page: Click Here
Join our WhatsApp Channel: Click Here
बहिणीला काय द्याल भेटवस्तू (Raksha Bandhan Gift For Sister In Marathi)
बहिणीचं नातं भावासाठी नेहमीच मोठं आणि महत्त्वाचं असतं. त्यामुळे लाडक्या बहिणीला भेट देताना तिच्या आवडीनिवडीचा विचार करा. तिला अशी भेटवस्तू द्या जिच्यामुळे तिला आनंद होईल.. शिवाय ती तिच्या उपयोगाचीपण असेल. भेटवस्तू देताना तिची किंमत पाहण्यापेक्षा त्यामागच्या भावनांचा जास्त विचार करा.
1. बांगड्यांसाठी ज्वेलरी बॉक्स (Jewellery Box For Bangles)
मुलींना पारंपरिक कपड्यांवर मॅचिंग बांगड्या घालायला आवडतात. अनेकींकडे निरनिराळ्या रंगाच्या आणि पॅर्टर्न्सच्या बांगड्या असतात. तुमच्या बहिणीलादेखील अशी आवड असेल. तर तिच्या बांगड्यांच्या कलेक्शनसाठी हे गिफ्ट नक्की घ्या. या खास बांगड्यांसाठी असलेल्या ज्वेलरी बॉक्समध्ये ती तिच्या आवडीच्या बांगड्या अगदी जपून ठेवू शकते.
2. मेकअप ब्रश सेट (Makeup Brush Set)
मुलींना मेकअप आणि त्या निगडीत गोष्टी नेहमीच आवडतात. जर तुमच्या बहिणीलादेखील मेकअपची आवड असेल तर तिला मेकअप ब्रशचं हे किट गिफ्ट करा. कारण मेकअपमध्ये तिला नेमकं काय आवडतं हे जरी तुम्हाला माहीत नसलं तरी हे गिफ्ट तिला नक्कीच आवडू शकेल. या मेकअप ब्रश किटमध्ये विविध प्रकारचे ब्रश आहेत. जे तिला अगदी फांऊडेशन बेस पासून लिपस्टिक लावण्यापर्यंत उपयोगी पडू शकतात. शिवाय हे गिफ्ट दिल्यामुळे तुम्ही तिच्या आवडीनिवडीची किती काळजी करता हे तिला जाणवेल. जे तुमचं नातं बांधून ठेवण्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.
3. इअर फोन (Ear Phone)
संगीत हा अनेकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे तुमची बहिण देखील संगीतप्रेमी असेल तर हे गिफ्ट तिला नक्कीच आवडेल. हेडफोनचा वापर प्रत्येकाला होतच असतो. त्यामुळे या राखीपौर्णिमेला बहीणीला हे छानसं हेडफोन देण्यास काहीच हरकत नाही. शिवाय हे फार महागडं गिफ्ट नसल्यामुळे तुम्हाला परवडण्यासारखं आहे.
4. घड्याळ (Watch)
घड्याळाची आवड प्रत्येकीला असतेच. शिवाय तुमच्या बहीणीला जर निरनिराळ्या ट्रेंडची घड्याळ कलेक्शन करण्याची आवड असेल तर हे गिफ्ट तिला जरूर द्या. आजकाल गोल्ड, रोज गोल्ड, सिल्व्हर, गोल्ड आणि सिल्व्हर अशी विविध प्रकारची घड्याळं मिळतात. मात्र तुमची बहिण कॉलेजला जाणारी असेल तर नव्या ट्रेंडचं एखादं घड्याळ तिच्यासाठी निवडा ज्यामुळे तिला ते नक्कीच आवडेल.
5. साडी (Saree)
साडी ही प्रत्येक स्त्रीसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे जर तुमची बहिण मोठी असेल अथवा विवाहित असेल तर तिला यंदा साडी नक्कीच द्या. साडी खरेदी करताना तिच्या आवडी निवडीचा विचार करा. तिला सिल्कची साडी आवडते की ती कॉटन, लीननच्या साड्या नेसते. तिला पारंपरिक डिझाईन्स आवडतात की मॉर्डन याचा नीट विचार करा. आम्ही तुम्हाला ही पेपरसिल्क साडी सूचवत आहोत. जी कोणत्याही स्रीला नक्कीच आवडेल.