Best Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या भद्रा काळ आणि भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
Raksha Bandhan 2024 Date
दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे. यावेळीही भावाला भद्रा काळ आणि शुभ मुहूर्त पाहूनच राखी बांधता येणार आहे. रक्षाबंधन कधी आहे? भद्रा काळ आणि भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
Raksha Bandhan Bhadra Kal
श्रवण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. भद्रा काळाची सर्वांनाच चिंता असते, कारण असे म्हटले जाते की भद्राकाळात भावाला राखी बांधली जात नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही भद्राची सावली असणार आहे. यावेळीही बहिणीला भद्राकाळ पाहूनच भावाला राखी बांधता येणार आहे. सण १९ जुलै रोजी साजरा केला जाणार आहे.
रक्षाबंधन शुभ मुहूर्त
पौर्णिमा तिथी यावर्षी १९ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी २० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होत आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार १९ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. राखी बांधण्यासाठी रात्री १ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजून ८ मिनिटे ही सर्वोत्तम वेळ आहे. एकूण ०७ तास ३८ मिनिटांचा मुहूर्त प्राप्त होत आहे. जर तुम्हाला संध्याकाळी राशी बांधायची असेल तर प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत आहे
रक्षाबंधन भद्रा काळ
रक्षाबंधनाला भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. असेही म्हटले जाते की, शूर्पणखाने भद्रा काळात आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती. ज्यामुळे रावणासह त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले. म्हणूनच भद्रामध्ये भावाने राखी बांधू नये. यावेळी भद्राबद्दल बोलायचे झाले तर भद्रा १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ५१ मिनिटे ते १० वाजून ५३ मिनिटापर्यंत राहील आणि दुपारी १ वाजून ३० मिनिटे ही अंतीम वेळ आहे. त्यामुळे यानंतर तुम्ही दुपारी भावाला राखी बांधू शकतात.
हेतू व महत्त्व
बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं होय. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय. फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या लोकांना तिचे महत्त्व कळत नाही.
ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मान- सन्मान, सत्कार होतो, तेथे सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणीपासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न ह्या सणाद्वारे केला जातो.
“राखी’ ह्या शब्दातच “रक्षण कर’ – “राख म्हणजे सांभाळ’ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय्य, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.
रक्षाबंधन कथा
पौराणिक कथा (raksha bandhan story in marathi) सांगितल्या जातात. काही जणांना या कथा माहीत आहेत, तर काही जणांना माहीत नाहीत. रक्षाबंधन माहिती मराठी म्हणून खास तुमच्यासाठी या दोन्ही कथा आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
माहिती किंवा रक्षाबंधनाची सुरूवात नक्की कधीपासून आणि कशी झाली, याबाबत कोणताच निश्चित पुरावा कोणाकडेच नाही. पण त्याविषयी अगदी पूर्वपरंपरागत एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नव्हते. दानवांचा राजा वृत्रासुर याने त्यावेळी देवांचा राजा इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले. इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाला. त्यावेळी इंद्रदेवाला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची अर्थात इंद्राणीने विष्णूकडून मिळालेला एक दोरा ज्याला राखी म्हणतात तो इंद्राच्या हातावर बांधला. या राखीच्या प्रभावाने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती त्याप्रमाणे इंद्रदेवाचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.
दुसरी कथा म्हणजे बळी नावाचा राजा अश्र्वमेध यज्ञ करत होता. त्याक्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले. बळी राजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता. तेच पाहण्यासाठी भगवान विष्णून वामन अवतार घेऊन त्याच्यासमोर उभे ठाकले. त्यांनी बळी राजाला तीन पाऊल जमीन दान करायला सांगितली. बळी राजा लगेच तयार झाला. त्याने वामन अवतार रुपी विष्णूंना जमिनीवर तीन पावलं ठेवण्यास सांगितली. विष्णूंनी पावलं मोजण्यास सांगितले. त्यावेळी विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी सामावली. दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळी राजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकलले.
बळी राजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला. मात्र त्याने विष्णूंकडे एक वचन मागितलं. राजा बळी म्हणाला की, मला असा आशीर्वाद घ्या की, इथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे पाहू शकेन. अगदी झोपेत, जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे. हा आशीर्वाद देवानेही मान्य केला. आणि बळी राजासोबत पाताळात राहणे पसंत केले.